एटीएसने केला मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलल्याचा दावा

मुंबई : “एंटीलीया” प्रकरण दररोज वेगवेगळे वळण घेत आहे. दररोज नवे खुलासे आणि दावे समोर येत असून, आज एटीएसने याप्रकरणी दोघांना अटक केल्याचे वृत्त समजते आहे.

याआधी एटीएसच्या तपासात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने, यांच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यामुळे, दोघांकडे चौकशी करण्यात आली होती. दाेघांचेही जबाब नोंदवून घेऊन, गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असेही एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते.

दरम्यान, आज एटीएसने मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस कॉन्स्टेबर विनायक शिंदे आणि बुकी असलेला नरेश धरे याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.

त्यामुळे वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले असल्याची शक्यता आहे. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावादेखील करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत.
Read Also

Recent News