मुंबई : राज्यभरात आवाक्यातील घरे सर्व सामान्यांना उपलब्ध करून देणारी म्हाडा संस्था, आता विद्यार्थ्यांसाठी देखील एक घोषणा घेऊन आली आहे. नुकतीच म्हाडाने विद्यार्थ्यांसाठी एक घोषणा केली असून, या घोषणेद्वारा आता म्हाडा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांचा निर्माण करणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच ट्विट करत या घोषणेची माहिती समाज माध्यमांद्वारे जनतेला दिली.
त्यांनी आपल्या ट्विट मध्ये, “कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार आहे. मुंबई शहरामध्ये ४ ठिकाणी असे वसतिगृह बांधण्यात येतील. त्याच्यातील पहिल्या वसतिगृहाची सुरुवात काळाचौकी, जिजामाता नगर येथे करण्यात येईल” अशी माहिती दिली आहे.
तसेच, “सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की, मुंबई, ठाण्यामधील म्हाडा कॉलनीमध्ये एक-एका इमारतीचा विकास करण्यासाठी म्हणून विकासकाने तिथल्या रहिवाशांबरोबर समझोता करार केला आहे. पण अनेक वर्षे या इमारतींचा विकास न-करता तसेच रहिवाशांना भाडे न-देता मुजोरपणाची वागणूक हे विकासक करीत आहेत. यापुढे 5 वर्षांपेक्षा अधिक जर विकासकाने इमारतीचे काम रोखून ठेवले. तर म्हाडाला ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार आहे.मुंबई शहरामध्ये 4 ठिकाणी असे वसतिगृह बांधण्यात येतील. त्याच्यातील पहिल्या वसतिगृहाची सुरुवात काळाचौकी, जिजामाता नगर येथे करण्यात येईल. pic.twitter.com/bpkGcQqEUS
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021
दरम्यान, म्हाडाच्या या निर्णयामुळे राज्यभरातल्या अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, त्यांची मोठ्या शहरांमध्ये होण्याची राहण्याची गैरसोय काही प्रमाणात का होईना सामन्याची आशा दिसत आहे.