मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान अनेक उद्योग-धंदे बंद पडले. हजारो लोकांना या काळात आपला रोजगार गमवावा लागला. देशातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत वाढत असल्याने आता तरुणाई थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडे रोजगार मागण्यास सुरुवात केली आहे.
‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असून, लोक सरकारकडे नोकरी देण्याची मागणी करत आहेत. सत्तेत आल्यानंतर नोकरी देणार या आश्वासनाचे काय झाले ? असा सवाल केला जात आहे.
सुनो जन के मन की बात-#modi_rojgar_do
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 21, 2021
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी देखील #modi_rojgar_do हा हॅशटॅग वापरत ‘सुनो जन के मन की बात’ असा सल्ला दिला पंतप्रधान मोदींना दिला आहे.
भाषण आणि मन की बात ने पोट नाही भरत मोदीजी..
रोजगार द्या..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 23, 2021
तर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधत, ‘भाषण आणि मन की बात ने पोट नाही भरत मोदीजी’, असा टोला लगावताना ‘रोजगार द्या’ अशी मागणी केली आहे.
Read Also
- अधिवेशनाच्या आधी मंत्रालयातील 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
- ‘अधिवेशन होऊ नये, असं सरकारचं मत नाही; मात्र…’ एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- लॉकडाऊनबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई, गृहमंत्र्यांचा इशारा
- 7 वेळा संसदेवर निवडून गेलेल्या खासदाराची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या
- …तर खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी द्या, मनसे आमदाराची मागणी