मुंबई : आयकर विभागाकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू फँटम फिल्म या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली होती. तापसी आणि अनुराग कश्यप हे सातत्याने मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. आता या प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत, असल्याचे सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच, पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? तुमच्या त्या ‘बॉलीवूड’मध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होत असतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात?, असा सवाल देखील अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे.
सामना अग्रलेखात म्हटले आहे की, मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले अनेकजण तर मोदी सरकारचे सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय?
भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळले आहेत. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्याआधारे कारवाई केली जाते, अशी ‘दिव्य’ माहिती जावडेकरांनी दिली आहे. म्हणजे बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे केंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?, असा सवाल देखील विचारला आहे.
Read Also
- शिवसेनेची ममता बॅनर्जींना साथ, घेतला ‘हा’ निर्णय
- …तर भाजप नेते ‘पंजा’ कापून टाकणार का ? पटोलेंचा सवाल
- सर्वसामान्यांना दिलासा, 1 एप्रिलपासून वीजदरात ‘इतक्या’ टक्क्यांनी कपात
- ‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा’; सत्यजित तांबेंनी भाजपला डिवचले
- ‘पळपुट्या मुख्यमंत्र्यांना सैनिकांनी देशासाठी दिलेलं योगदान कसं कळणार?’