पंढरपुर: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज हजारोंच्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची भर पडत आहे. अश्यातच आता महाराष्ट्रात पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार ताकद लावली आहे. महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दोन बंडखोर अपक्ष या सर्वांमध्ये मुख्य लढत होणार आहे. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यातच आता पंढरपूरातून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे.
माझी कोरोनाची टेस्ट आज पाॅझिटीव्ह आली आहे,त्यामुळे मी क्वारंटाईन होत आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी व स्वतःची काळजी घ्यावी.
— Ranjitsinh Mohite Patil (@Ranjitsinh05) April 7, 2021
भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ” माझी कोरोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली असून मी क्वॉरन्टीन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्या व स्वतःची काळजी घ्या, ” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारात रणजितसिंह मोहिते पाटील सहभागी झाले होते. भाजप उमेदवार आणि सोबत प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या अडचणी वाढणार वाढणार आहेत.
समाधान अवताडेंसाठी मोहितेंनी घेतली होती महत्वाची बैठक
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यत्वे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अथक प्रयत्न करत पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक आणि मंगळवेढ्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना एकत्र आणलेले आहे. समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज भरून त्यावर पाणी फेरले आहे. समाधान आवताडे यांना घरातूनच मिळालेले आव्हान मोडीत काढण्यासाठी देखील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बैठक घेतली होती.