मुंबई : राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून देशभरातील जनतेकडून देणगी जमा केली जात आहे. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांकडून यावरून सडकून टीका केली जात आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा मुद्दा उपस्थित झाला होता. आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपला डिवचले आहे.
सत्यजित तांबेंनी एक व्हिडीओ शेअर केला असून, यात एक व्यक्ती राम मंदिरावरून भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. गेली अनेक वर्ष भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा राहिलेला आहे. यावरूनच व्हिडीओमध्ये व्यक्ती भाजपवर टीका करत आहे.
व्हिडीओमधील व्यक्ती भाजपवर टीका हिंदीतून गोष्ट सांगत आहेत. यात ते म्हणतात की, सर्वजण श्रीरामाकडे येतात, त्यावेळी श्रीराम त्यांना सांगतात मी तर भाजपच्या जाहीरनाम्यात पडून असतो. त्यामुळे मी कसा काय मोठा?
#जय_श्रीराम #JAISRIRAM pic.twitter.com/8YMVdG48lJ
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 4, 2021
निवडणूक आली की श्रीरामांना बाहेर काढले जाते आणि निवडणूक संपली की जेथे आहेत तेथेच पुन्हा येतो. हेच भाजपचे सत्य असून, याबाबत सर्वांनाच माहिती आहे, अशी टीका व्हिडीओमधील व्यक्ती करताना दिसत आहे.
सत्यजीत तांबेंनी हा व्हिडीओ शेअर करत भाजपला जोरदार टोला लगावला आहे. दरम्यान, याआधी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवर हल्ला चढवला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील मंदिर उभारणीसाठी घेतली जात असलेल्या देणगीवरून भाजपवर निशाणा साधला.
Read Also
- ‘पळपुट्या मुख्यमंत्र्यांना सैनिकांनी देशासाठी दिलेलं योगदान कसं कळणार?’
- अजित पवारांनी शब्द पाळला, फडणवीसांची बदनामी करणाऱ्या अटक
- ‘पोलीस यंत्रणेवर दबाव नसल्यानेच…’, भाजप महिला नेत्याचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
- ‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत’
- पूजा चव्हाणनंतर आता ‘या’ प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी सरकारला धरले धारेवर