मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय राठोड हे पहिल्यांदाच समोर येत त्यांनी आपली भूमिका मांडली. जा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पोलीस चौकशी सुरू असून, या तपासातून सत्य समोर येईल, असे ते म्हणाले. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे.
बिळातला नाग बाहेर आला, त्या नागोबाला माहित होतं आपण जर बाहेर आलो नाही तर चित्राताई त्याला ठेचून काढतील. या भितीने नागोबा बाहेर आला आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी राठोडांवर केली आहे.
'चित्राताई ठेचतील या भीतीने नागोबा बाहेर आला'@ChitraKWagh@BJP4Maharashtra@bjp4mumbai#poojachavhan #SanjayRathod pic.twitter.com/adErfNSQQQ
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 23, 2021
चित्रा ताई वाघ यांनी काल पोलीस महानिरीक्षकांची आणि राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला कुठल्याही प्रकारे पोलीस निपक्षपातपणे चौकशी करत आहेत असं वाटत नाही, असा आरोप करतानाच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे देखील लाड यांन सांगितले.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील राठोड यांच्यावर सडकून टीका केली. सध्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला साजेसं नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरलं. बंजारा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो, असे त्या म्हणाल्या.
Read Also
- भाषण आणि मन की बात ने पोट नाही भरत मोदीजी, ‘रोजगार द्या’ ट्विटरवर ट्रेडिंग
- अधिवेशनाच्या आधी मंत्रालयातील 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
- ‘अधिवेशन होऊ नये, असं सरकारचं मत नाही; मात्र…’ एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- लॉकडाऊनबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई, गृहमंत्र्यांचा इशारा
- 7 वेळा संसदेवर निवडून गेलेल्या खासदाराची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या