बीड : धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठल्या अधिकाराने मागत आहात? आता तुम्ही केलेल्या सर्वं घोटाळ्यांची चौकशी लावायला पाहिजे, अशा शब्दात बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या रेखा फड यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांन राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांनी धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यावरून रेखा फड यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठल्या अधिकाराने मागताय ?? तसे ही ते निर्दोष आहेत ही सिद्ध झालेलं आहेचं. आणि भाऊंनी काही सत्य लपवूनही ठेवलं नाही ते त्यांनी स्वतः सांगितलं आहे. आता तुम्ही केलेल्या सर्वं घोटाळ्यांची चौकशी लावायला पाहिजे, असे ट्विट करत फड यांनी पंकजा मुंडेवर हल्ला चढवला.
चौकशी नक्कीचं लावली पाहीजे. नाही तरी तुमच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्द होऊन ही 8 आरोपी मंत्र्यांना क्लीन चिट देवून फडणवीसांनी राजीनामा नाही हो दिला ?, असा सवाल देखील त्यांनी केला.
Read Also
- आता ‘या’ मंत्र्यावर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
- ‘लोकसभेत 56 इंच छातीचे पंतप्रधान आहेत; पण खासदारच असुरक्षित’, पटोलेंचे टीकास्त्र
- ‘आणीबाणी चुकीचीच होती’, राहुल गांधींकडून जाहीर कबुली
- …म्हणून 60 पेक्षा कमी वय असतानाही सुप्रिया सुळेंनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
- राजकारणातील चाणक्य प्रशांत किशोर यांना ‘या’ राज्य सरकारने दिला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा