औरंगाबाद : राज्यात कमी झालेली कोरोनारुग्णांची संख्या आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन, तसेच रात्र संचारबंदी करण्यात आली आहे. अनेक नेत्यांना देखील मागील काही दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
इम्तियाज जलील यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली असून, पुढील उपचारासाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
Salaam everyone
I have tested positive for Covid today.
3 days ago I had a few symptoms and had isolated since then.
Have been admitted for further treatment.Stay safe everyone, also remember in prayers.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) February 22, 2021
मला आज कोरोनाची लागण झाली असून, 3 दिवसांपासून मला लक्षणे होती. तेव्हापासूनच मी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती जलील यांनी ट्विट करत दिली.
दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी कोरोना होण्याची झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना हे मागील काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
Read Also
- धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नाला तुफान गर्दी, गुन्हा दाखल
- …हे महान काम मोदी सरकार मोफत करत आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र
- ‘अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात?’, विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा सवाल
- पोस्टरबॉय रोहित पवारांचं धोरण म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार’
- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण