कोल्हापूर : सारथीचं उपकेंद्र कोल्हापूरला झालं पाहिजे. आरक्षणाची चोरी होतेय हे उघड आहे. मात्र, राजकरणामुळे हे दाबलं जातं आहे. त्यामुळे मराठा समाज भरडला जातो आहे. सारथीमध्ये अजित पवार यांच्या कामाच्या स्पीडला तग धरणारी यंत्रणा त्याठिकाणी नाही असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केलं आहे. तसेच मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे.
सगळीच सत्व परीक्षा मराठा समाजाने द्यावी, अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली असून हे चुकीचं आहे, असं सांगतानाच प्रत्येकवेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली.
MPSC मध्ये यशस्वी होणारे तरुण केवळ एक टक्का आहे. खासगी क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी”, अशी मागणी राजेंद्र कोंढरे यांनी सरकारला केली आहे.आम्ही ओबीसीमध्ये आलो आहे, वड्डेटीवार यांचा काहीतरी गैरसमज आहे. संधी मिळाली नाही तर हातात दगड घेणारच ना ?”,असंही ते म्हणाले
Read Also
संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात का आणखी कोणावर ? छगन भुजबळ यांचा सवालhttps://t.co/ENG6tsGnam#Chhaganbhujbal #ChhatrpatiSambhajiRaje #MarathaReservation @ChhaganCBhujbal @YuvrajSambhaji
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020