सांगली : देशासह राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सर्वसामान्यांसह राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा प्रतिक पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावा.
– प्रतिक जयंत पाटील@PrateekJPatil
— Prateek Shailaja Jayant Patil FC (@PrateekSJP) March 1, 2021
तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले.
दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीतील अनिल देशमुख, एकनाथ खडसे, राजेश टोपे या नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
Read Also
- ‘महाराष्ट्रामध्ये नियम, कायदा व शिस्त राहिली आहे की नाही?’, राणेंचा संतप्त सवाल
- ‘एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली, आता…;’ पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट
- मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला केंद्रीय मंत्र्यांची दांडी, फडणवीस म्हणाले…
- मुंबईसह इतर महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार ?
- ‘देशातील जनता शांत दिसत असली तरी…’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा