नाशिकमध्ये लग्नाला हजेरी लावल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल झालेत. त्यातील एक मंत्री कोविड पॉझिटीव्ह असल्याचं समोर येतंय. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस हेलिकॉप्टरमध्ये साजरा होतो. त्या पाठोपाठ त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं समजतं. त्या आधी त्यांचा राजकीय दौरा राज्यभर सुरु होता. त्यांच्या सभांची, कार्यक्रमांची सुरुवात विदर्भातून झाली आज तिथेच सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत,’ अशी टीका मुळीक यांनी केलीय.
‘काँग्रेस पक्ष मुंबईत शक्ती प्रदर्शन करतोय, रॅली काढतोय, पुण्यात राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. डिजिटल युगात कोणीही गोष्ट लपून राहात नाही’, असंही मुळीक म्हणाले. फक्त भाजपच्या नेत्यांवर सूड उगवायच्या भावनेने कारवाई करू नये, सर्वांना सारखे नियम लावावे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केलीय.
पूजा चव्हाण प्रकरणात गेले काही दिवस मौन बाळगणारे शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवीचं गडावर पोहोचले. त्यावेळी राठोड समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असून, राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र “संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, प्रत्येकाने जबाबदारी पाळली पाहिजे होती”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
दुसऱ्यांकडे नियम आणि बोट दाखवताना राज्यातील मंत्र्यांनीही आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. आम्ही शिवजयंची साजरी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, महाविकास आघाडीमधील नेत्यांचे जाहीर कार्यक्रम सुरु आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होऊ घातलं असतारा राष्ट्रवादीचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, यातून वेगळा संदेश जाऊ शकतो, असंही राणा यांनी म्हटलंय.
Read Also
जनतेवर कारवाई होते, तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी ; अमोल कोल्हे यांची मागणी
बिहारच्या लोटस ऑपरेशनंतर आता पश्चिम बंगाल निवडणुकीत फडणवीसांवर मोठी जबाबदारी