मुंबई : मागील काही वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळ्या पक्षांनी आश्वासने दिली होती पण प्रत्यक्षात मात्र धनगरांना आरक्षण दिलेलं नाही, महाराष्ट्र शासनाने धनगरांना आरक्षण दिले नाही तर मी मातोश्रीवर,मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आणि सिल्वर ओकसमोर मी ढोल वाजवून आंदोलन करणार असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भात मुद्दा गाजत असताना आता धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी आमदार पडळकरांनी केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. सध्या धनगर समाज हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आम्हाला सामावून घ्या या मागणीसाठी आंदोलन करत आहे. मुळात ही समाजाची मागणी फार जुनी आहे. आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान पडळकरांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले आहे. पडळकरांनी पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन ढोल बजाओ आंदोलन केले.