कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मराठा आरक्षणावरून मराठा तरुणांनमध्ये असलेला असंतोष आता उफाळून यायला सुरुवात झाली आहे. या आधीच आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र आता मराठा तरुणांमधील राग व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र युवकांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली ! असे संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू ! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही असे कळकळीचे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का ? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.
काय घडलं नेमकं
बीड तालुक्यातील केतूरा गावात यामुळे करुण घटना घडली आहे. अठरा वर्षांच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विवेक याने नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल असावं, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. आरक्षण असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
Read Aslo
PM मोदींसह CM योगींना पाठवणार दहा हजार पत्रे ! हाथरस प्रकरणावरून रुपाली चाकणकर आक्रमकhttps://t.co/7PqWlyxAFN#JusticeForManishValmiki #ncp #sharadpawar #rupalichakankar #supriyasule #HathrasCase @ChakankarSpeaks @supriya_sule @SakshnaSalgar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020