मुंबई : काल (1 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. मोदींपाठोपाठ अनेक राजकीय नेत्यांनी लस टोचून घेतली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील लस घेतली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
शरद पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांनी कोरोनावरील लस घेतली.
देशात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जाते. सुप्रिया सुळे यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असले तरीही त्यांना शुगर आणि उच्च रक्तदाब असल्याने त्यांनाही कोरोनाची लस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईमधील जे जे रुग्णालयात मी करोना लसीचा पहिला डोस घेतला. डॉक्टर लहाने आणि जे जे रुग्णालयातील सर्व टीमचे आभार. करोना लस सुरक्षित आहे. सर्वांना विनंती आहे की, नोंदणी करा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा लस घ्या, असे आवाहन देखील सुप्रिया सुळेंनी केले.
Read Also
- राजकारणातील चाणक्य प्रशांत किशोर यांना ‘या’ राज्य सरकारने दिला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
- ‘या’ लोकांना कधीही कोरोना होणार नाही – राज्यपाल कोश्यारी
- ‘… तर अजित पवारांचे स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केले पाहिजे’
- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
- ‘संजय राठोडांनी पूजाच्या आई-वडिलांना 5 कोटी रुपये दिले’