मुंबई: कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावीअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली होती. तेथे झालेल्या गर्दीवरून सध्या सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत गर्दी न करता साजरे करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आज संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रथमच बोलणार असल्याने सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.दरम्यान, राज्य सरकारने शिवजयंतीला निर्बंध लावले होते आणि नेत्यांच्या राजकीय कार्यक्रमांवर कोणतीही कारवाई नाही.