नाशिक : राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे बेडस् व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून, नागरिकांकडून निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने, येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, नाशिकमध्ये गुरुवारी दिवसभरात ३ हजार ७८४ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर ३ हजार १०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत २ हजार २६२, नाशिक ग्रामीणमध्ये १ हजार ३३५, मालेगाव महापालिका हद्दीत १३६ तर जिल्हा बाहेरिल ५१ रुग्णांचा समावेश आहे.
एकीकडे जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या असताना, दुसरीकडे रुग्णांना व्हेंटिलेटर, बेड मिळत नसल्याची बाब, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आल्यानंतर, त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे संताप व्यक्त केला. तसचं त्यानंतर तासाभरातचं जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही कठोर कारवाई केली असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांच्यावर,. करोना उपाययोजनांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे,
दरम्यान, गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.
Read Also
- राज्यात लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांचे आज रात्री ८:३० वाजता फेसबुक लाईव्ह
- पुण्यात सात दिवसांचं मिनी लॉकडाऊन “या” सेवा राहणार बंद
- ‘अजित पवारांना फोन करून देखील बेड मिळणार नाही’
- राज्यात निर्बंध अधिक कठोर होणार, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
- देशातील अर्थचक्र सुरळीत, देशाच्या वस्तू आणि सेवा करात तब्बल २७% वाढ