तेजपूर (आसाम) : आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात असून, काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी सातत्याने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यांचे दौरे करत आहेत. सोबतच, अनेक घोषणा देखील त्यांच्याकडून केल्या जात आहे. आता काँग्रेस सत्ते आल्यास आसाममध्ये सीएए कायदा रद्द करू अशी घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी केली आहे.
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करणारा नवा कायदा राज्यात आणला जाईल, असे प्रियंका गांधींनी आसाममध्ये म्हटले आहे. आसाममध्ये सीएए कायद्याविरोधात रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रियंका गांधींनी यावेळी आसाममध्ये चहाच्या मळ्यात महिलांसोबत काम देखील केले. तसेच, चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचे दैनंदिन वेतन 167 वरून 365 रुपये करण्याची, राज्यातील गृहिणींना दरमहा दोन हजार रुपयांची मदत दिली जाईल आणि सर्व घरगुती वीज ग्राहकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
आसाममध्ये काँग्रेस सरकार आल्यास कमीत कमी 5 लाख सरकारी नोकरी उपलब्ध करण्याचे वचन देखील प्रियंका गांधींनी दिले.
Read Also
- ‘हा विषय केंद्रासमोर का मांडला नाही?’, चीनच्या सायबर हल्ल्यावरून बावनकुळेंचा सवाल
- ‘दोन पक्षातली प्रकरणं बाहेर आली, आता तिसऱ्या पक्षाची वेळ’, आठवलेंचे सूचक वक्तव्य
- ‘आता तुम्ही केलेल्या घोटाळ्यांची चौकशी लावायला पाहिजे’, राष्ट्रवादीच्या नेत्याची पंकजा मुंडेंवर टीका
- आता ‘या’ मंत्र्यावर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
- ‘लोकसभेत 56 इंच छातीचे पंतप्रधान आहेत; पण खासदारच असुरक्षित’, पटोलेंचे टीकास्त्र