मुंबई : केंद्र सरकारकडून जीएसटीचा निधी राज्य सरकारला उपलब्ध होत नसल्यामुळे राज्याच्या अर्थ संकल्पावर त्याचा परिणाम जाणवेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, केंद्रीय अर्थमंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीचे 11 हजार 519.31 कोटी दिले आहेत. त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना आणि राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी. प्रत्येक गोष्टींचं खापर केंद्र सरकारवर फोडणं बंद करावं, असा जोरदार टोला लगावला आहे.
प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे व जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अर्थ मंत्रालयाने देशातील 28 राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे 2019-20 मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जीएसटी परताव्याची रक्कम 19 हजार 233 कोटी देण्यात आली आहे.
देशावर कोरोनोचे संकट असतानाही केंद्र सरकारने 1 लाख कोटीचा जीएसटीचा परतावा देशातील सर्वच राज्यांना दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जीएसटीची कारणे न देता विकास करावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also
- कोरोना कोविड19 चा आहे की राजकीय ? नितेश राणेंनी उपस्थित केली शंका
- अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या ‘त्या’ आमदाराला कोरोनाची लागण
- एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह
- धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नाला तुफान गर्दी, गुन्हा दाखल
- …हे महान काम मोदी सरकार मोफत करत आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र