सिंधुदुर्ग : येत्या 1 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र त्याआधी कोरोनाचा धोका वाढल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा नियम कठोर केले आहे. महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून यावर शंका उपस्थित केली जात आहे.
मनसे पाठोपाठ आता भाजप नेते नितेश राणेंनी देखील राज्यभर फिरणाऱ्या मंत्र्यांना आठ दिवसांमध्ये झालेला हा कोरोना खरा आहे की, हा राजकीय कोरोना आहे? असा सवाल करत शंका उपस्थित केली आहे.
येणाऱ्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे, अशी शंका नितेश राणेंनी उपस्थित केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांना कधी आतापर्यंत कोरोना झाला नव्हता. तो बरोबर अधिवेशनाच्या आधी 8 दिवस झाला. जयंत पाटील हे कुटुंब संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत झाला नव्हता, तो बरोबर 8 दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read Also
- अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या ‘त्या’ आमदाराला कोरोनाची लागण
- एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह
- धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नाला तुफान गर्दी, गुन्हा दाखल
- …हे महान काम मोदी सरकार मोफत करत आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र
- ‘अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात?’, विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा सवाल