मुंबई : मुंबईतील ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ करण्यात आल्याने भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारनं हा बोजा लादला आहे’, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, खटूवा समितीचा अहवाल ठाकरे सरकारने स्वीकारल्यामुळे 1 मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ होणार आहे. कोरोनामुळे आर्थिकअडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारने हा बोजा लादला आहे. धंदा कमी होईल या भीतीने अनेक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे.
खटूवा समितीचा अहवाल ठाकरे सरकारने स्वीकारल्यामुळे 1 मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ होणार आहे.
कोरोनामुळे आर्थिकअडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारने हा बोजा लादला आहे.
धंदा कमी होईल या भीतीने अनेक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे. pic.twitter.com/ME9hxz5UxB— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2021
रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आता भाजपकडून विरोध केला जात आहे.
कोरोनाच्या काळात सामान्य मुंबईकरांना एका रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने आता सामान्य मुंबईकरांचा शिल्लक असलेला खिसा सुद्धा रिकामा करण्याचा घाट घातला आहे, अशी टीका करतानाच भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा भातखळकरांनी दिला आहे.
Read Also
- प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडणे बंद करा, चंद्रकांत पाटलांचे अजितदादांना उत्तर
- कोरोना कोविड19 चा आहे की राजकीय ? नितेश राणेंनी उपस्थित केली शंका
- अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या ‘त्या’ आमदाराला कोरोनाची लागण
- एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह
- धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नाला तुफान गर्दी, गुन्हा दाखल