नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील विधानसबा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आसाममध्ये मार्च 27 ते एप्रिल 6 अशा तीन टप्प्यात मतदान होणार असून, याच पार्श्वभूमीवर लवकरच राजकीय पक्षांकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सध्या आसाममध्ये सत्तेत असलेल्या भाजपला सत्ता टिकवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. येथील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) सोबत यूती केली असून, तीन पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाल्याचे सांगितले जाते.
जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांबाबत भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक पार पडली. यात भाजप आसाममध्ये 92 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे. तर घटक पक्ष असलेले एजीपी 26 आणि यूपीपीओ 8 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत.
2016 मध्ये भाजप पहिल्यांदाच आसाममध्ये सत्तेत आली होती. पुन्हा एकदा सत्ता टिकण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
Read Also
- ‘…त्याचीच किंमत तापसी, अनुरागला चुकवावी लागत आहे’, शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल
- शिवसेनेची ममता बॅनर्जींना साथ, घेतला ‘हा’ निर्णय
- …तर भाजप नेते ‘पंजा’ कापून टाकणार का ? पटोलेंचा सवाल
- सर्वसामान्यांना दिलासा, 1 एप्रिलपासून वीजदरात ‘इतक्या’ टक्क्यांनी कपात
- ‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा’; सत्यजित तांबेंनी भाजपला डिवचले