मुंबई : 1 मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र अधिवेशनावर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. अनेक मंत्र्यांपाठोपाठ आता मंत्रालयातील जवळपास 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मंत्रालयात कार्यरत असलेल्या महसूल, शिक्षण आणि अन्य विभागाच्या 35 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. मंत्रालयात मागील आठवड्यातच महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. सोमवारी आणखी 23 कर्मचारी व अधिकाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुंळे मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेशी संवाद साधताना परिस्थिती पाहून पुढील आठ दिवसांत लॉकडाउनसंबंधी निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसात राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यावरून भाजप आणि मनसे नेत्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे. तसेच अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.
Read Also
- ‘अधिवेशन होऊ नये, असं सरकारचं मत नाही; मात्र…’ एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- लॉकडाऊनबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई, गृहमंत्र्यांचा इशारा
- 7 वेळा संसदेवर निवडून गेलेल्या खासदाराची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या
- …तर खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी द्या, मनसे आमदाराची मागणी
- मुंबईकरांचा खिसा रिकामा करण्याचा ठाकरे सरकारचा घाट, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवरून भातखळकरांची टीका